Wednesday, 20 August 2014

मन........


मनाचं  पावसाळणं  मनाचं  गंधाळणं
मनाचं  चिंब भिजुन तुझ्यातच सामावणं ……

मनाचं उमलणं मनाचं  बहरणं
मनाचं  तुझ्या श्वासातच अलगद हरवणं……

मनाचं  बावरणं मनाचं  शहारणं
मनाचं  तुझ्या मिठीत हळुवार विसावणं……

मनाचं  हुरहूर लावणं मनाचं  घाबरणं
तू निघून जाताच मनाचं वेड्या हसर्या डोळ्यांनी पाणावनं……



सोनाली गाढवे देशमुख. दि. २० ऑगस्ट २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.



क्षितीज चांदणी......

फिरुनी उगवली पुन्हा लाजरी 
चांदणी ती क्षितीजावरी …
डोळे तिचे भिरभिर अवघे 
शोधी साजणा दूर नभी …. 

सैरभैर निळ्या नयनी तिच्या 
तो येण्याचे भास खेळती …. 
क्षणात हसरी क्षणात बावरी 
तिच्या चेहर्याचे रंग बदलती …. 

हळूच लपलेला ढगा आडूनी 
चांद हासला खट्याळ परी …. 
लपंडाव प्रीतीचा अबोल 
आभास गोड अंतरंगी …. 

चंद्राच्या चांदण्यात मग 
अवघी रात्र न्हाऊन निघाली  …. 
थरथरनाऱ्या ओठांपरी 
चांदणीही शहारून गेली  …. 

प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग 
अवघा रंग निळा झाला   …. 
चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन 
गंध श्वासात मिसळूनी गेला  ….




सोनाली गाढवे देशमुख. दि. २० ऑगस्ट २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.



Monday, 11 August 2014

नातं

लक्ष लक्ष चांदण्यांन्या
माझी ओंजळ हि पुरून उरेल ….

तुझं माझं गोड नातं
पुन्हा एकदा नव्यानी रुजेल …


सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ ऑगस्ट २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.



तु......

रातराणी गंधाळली , चंद्र सुद्धा स्तब्ध झाला
वेडा पिसा वारा वाट जणू हरवून बसला….

तुझ्याच सारखी फसवी पावसाची मग सर आली
अन मनाच्या आभाळात इंद्रधनु ती देऊन गेली….


सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ ऑगस्ट २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.