Wednesday, 16 July 2014

आठवणींची सर ...

आठवणींची सर अलगद येते , भूतकाळातल्या क्षणात हरवून जाते ,
ओलावतं हसू ओलावतात क्षण , ओलावतात पापण्या ओलावतं मन 

कठीण जात मग बाहेर पडताना , आठवणी मनाशी कुरुवळत स्वतःशीच झगडताना 
आभाळाचाही कंठ दाटून येतो मग , तो हि आज तसाच बरसतोय बघ …


- सोनाली गाढवे देशमुख. दि. १६ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.