Friday, 11 July 2014

पाऊस

आसवं बनून डोळ्यात उतरतो , मातीचा सुगंध बनून श्वासात मिसळतो 
पाठ शिवणीचा खेळ खेळत हुरहूर लावतो , भेटल्यावर आठवणीत चिंब भिजवत...

अल्लड बेधुंद वाऱ्यासोबत नाचतो , उरातल्या वादळाची उत्तरं बनून जातो 
ओठांवरच गमावलेलं हास्य घेऊन येतो , निसटलेल्या शब्दांची साथ बनून जातो.... 


- सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ जुलै २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.





No comments:

Post a Comment