खिडकीतलं आभाळ कधी हळूच मनाच्या कोपऱ्यात विसावतं अन मनभर पसरतं, कळतंच नाही …… अन मग ते मनात दाटलेलं आभाळ मोकळं होण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास जरूर सांगा ……….
Saturday, 17 September 2016
.........बाकी आहे
तुझ्या माझ्या आठवांचे
जाहले कि कोळसे
अजून कशाची व्हायची
राख बाकी आहे
तू परतल्या मार्गावरून
फिरुनी ना पाहिले
सुकलेल्या पाचोळ्याची मात्र
साथ बाकी आहे
भरजरी स्वप्नांची लत्करे
होऊन गेली
दरिद्री चांदण्याची अजूनही
रात बाकी आहे
तू सजवलेल्या भिंतींचा
रंग केव्हाच विटला
ओसाड शून्य स्वप्नाची
चौकट बाकी आहे
Friday, 16 September 2016
तुझे हास्य
निखळ तुझे हास्य जणू चांदण्यांचा कवडसा ...
सोनपंखी ऊन्हा मागे ओसरता मेघ जसा …
- सोनाली गाढवे देशमुख. दि. २० एप्रिल २०१६
© सोनाली गाढवे देशमुख.
Thursday, 15 September 2016
जिभ
कशाला गरज तुला चाकू सुऱ्यांची
शब्दांचेच आघात आता असह्य झाले
नको दाखवू गडगंज श्रीमंती तू जिभेजी
चालणारे बोलणारे माझे प्रेत झाले
- सोनाली गाढवे देशमुख. दि. १५ सप्टेंबर २०१६
© सोनाली गाढवे देशमुख
शब्दांचेच आघात आता असह्य झाले
नको दाखवू गडगंज श्रीमंती तू जिभेजी
चालणारे बोलणारे माझे प्रेत झाले
- सोनाली गाढवे देशमुख. दि. १५ सप्टेंबर २०१६
© सोनाली गाढवे देशमुख
Subscribe to:
Comments (Atom)



