खिडकीतलं आभाळ कधी हळूच मनाच्या कोपऱ्यात विसावतं अन मनभर पसरतं, कळतंच नाही …… अन मग ते मनात दाटलेलं आभाळ मोकळं होण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास जरूर सांगा ……….
Monday, 14 July 2014
Saturday, 12 July 2014
आठवणीतला पाऊस.......
पावसाची आणि माझी पडली जेव्हा गाठ
मी नुसताच पाहतच राहीलो तेवढ्यात त्याने धरला माझा हात ….
थांब थांब म्हणत पळत सुटलो कोपऱ्यात
तेवढ्यात तो पोहचला माझ्या सर्वांगात …….
म्हणाला काय आहे ना दोस्ता तुम्हाला आहे विसरायची हौस
अरे तोच मी शाळेतला कट्ट्यावरचा पाऊस …….
तुमचा कट्ट्यावरचा ग्रुप अजूनही आठवतोय
माझी वाट पाहणारी पोरं तुम्ही आता नुसत्याच आठवणी साठवतोय…….
कचाकचा चिखलात माझ्यासोबत खेळायचात
आता मात्र इस्त्रीच्या कपडयावर एक ठिपका हि नाही खपायचा …….
बिझी लाईफ schedule मध्ये हरवून गेलात तुम्ही
पण मी येतो पूर्वीसारखाच गात गाणी जुनी ……
मी आजही येतो जुने रस्ते गल्ली ,चहाच्या टपऱ्या शोधत असतो ,
वाटतं कुठेतरी भेटाल , नी हिरमुसून माघारी फिरतो ……
आज अचानक भेटलास अन आनंदाश्रु वाहिले
त्यातच थोडा भिजला असशील sorry म्हणतो पहिले ……
बदललात राव तुम्ही सारे म्हटलं तुला आठवण करून द्यावी
अन आठवणीतल्या पावसाची एक कविता ऐकवावी …..
- सोनाली गाढवे देशमुख. दि. १२ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
© सोनाली गाढवे देशमुख.
Friday, 11 July 2014
पाऊस
आसवं बनून डोळ्यात उतरतो , मातीचा सुगंध बनून श्वासात मिसळतो
पाठ शिवणीचा खेळ खेळत हुरहूर लावतो , भेटल्यावर आठवणीत चिंब भिजवत...
अल्लड बेधुंद वाऱ्यासोबत नाचतो , उरातल्या वादळाची उत्तरं बनून जातो
ओठांवरच गमावलेलं हास्य घेऊन येतो , निसटलेल्या शब्दांची साथ बनून जातो....
- सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
- सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
Thursday, 10 July 2014
तुझी भिरभिरणारी नजर
तुझी भिरभिरणारी नजर माझ्यावर येउन खिळलेली
पापणीही न लवता माझ्याच नजरेत मिसळलेली
डोळ्याच्या वाटेने हळूच मनापर्यंत पोहचलेली
मनाचं दार उघडून अंतरंगात विसावलेली.
अचानक सगळ्या कोड्याची उत्तरं गवसलेली
रणरणत्या उन्हात देखील चांदण्यात न्हाऊन निघालेली
सुखद मोरपिशी स्पर्शाने शहारलेली
अन मी वेडी त्या एका नजरेतच
माझं अस्तित्व गमावून बसलेली.
- सोनाली गाढवे देशमुख. दि. १० जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
- सोनाली गाढवे देशमुख. दि. १० जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
Tuesday, 8 July 2014
हरवलेलं नातं
काही नाती अशीच असतात , रेशमी धाग्याला नकळत पडलेल्या गाठीसारखी
ती गाठ कधी पडली विचार करता करता घट्ट होत जाते न सोडवता येईपर्यंत
ती गाठ तिथच तोडून दिली तरी धागा पुर्ववत होत नसतो , तो ताणतो अन विरळ होतो कायमचा
नात्यांचही तसच ……………
आपली वाटणारी माणसं गर्दीलत्या माणसात विरघळून जातात नकळत
नकळत होणारे गैरसमज आणि त्यामुळे नात्यांची विण घट्ट करता करता उसवत गेलेली ,उधसलेली खोलवर कुठतरी ………
उसवलेले टाके पुन्हा घालता येतात का , आणि आलेच तरी पुन्हा न उधसण्या इतपत तर नक्कीच नाही ना
मग ते आत आत उसवलेलं असच घेऊन जगायचं ,
ते उधसलेपण पापण्यात दडवायचं ओठात अडवायचं ,
मनातल्या कप्प्यात डांबून ठेवायचं अगदी खोल आणि कुणाला जाणवू हि नाही द्यायचं, विस्कटलेल कपाट सावरावं तसं सावरायचं कुणाला कळू नये म्हणून
कसली अजब तारेवरची कसरत
कारण एकच… आपणच गुंतलेलो असतो त्या नात्यात ,आणि तो गुंता सोडवता सोडवता गुरफटत गेलेलो असतो , कदाचित आपलीच इच्छा नसते का बाहेर पडायची ……
खरंच नाती पुन्हा नव्यानी विणता आली असती तर ……… आयुष्य ,जगणं सोप्पं झालं असतं का ?
- सोनाली गाढवे देशमुख. दि. ०८ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
- सोनाली गाढवे देशमुख. दि. ०८ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
Monday, 7 July 2014
Saturday, 5 July 2014
Subscribe to:
Posts (Atom)






