खिडकीतलं आभाळ कधी हळूच मनाच्या कोपऱ्यात विसावतं अन मनभर पसरतं, कळतंच नाही …… अन मग ते मनात दाटलेलं आभाळ मोकळं होण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास जरूर सांगा ……….
Monday, 11 August 2014
Monday, 28 July 2014
एक प्रश्नचिन्ह.....
पूर्णविरामाच्या शोधात
ठेचकाळलेलं विरामचिन्ह…
अन
त्यातनं जन्माला आलेलं एक प्रश्नचिन्ह
एक
प्रश्नचिन्ह सर्वांनाच पडलेलं
आपापल्या
परीने अपूर्णात अडकलेलं
प्रश्नचिन्ह
प्रश्नचिन्ह
त्यातलच
कोडं
कोड्यातलं
गणित
गणितातला
विभाजक
अन
उरलेली बाकी
तशीच
अपूर्ण …
आणि
पुन्हा नव्यानी पडलेलं एक प्रश्नचिन्ह…
अन
पूर्णविरामाच्या शोधात ठेचकाळलेलं विरामचिन्ह…- सोनाली गाढवे देशमुख. दि. २८ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
Tuesday, 22 July 2014
Monday, 21 July 2014
पहाट...
काळोख निघाला ओलांडूनी कृष्णतीर
- सोनाली गाढवे देशमुख. दि. २१ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
वाजे राउळी चौघडा, विझे चांदण्यांची रांग…..
उगवला नारायण , सोनपाऊली उतरून
नवी पहाट नटली भक्तीत न्हाहून चिंब ……
उगवला नारायण , सोनपाऊली उतरून
नवी पहाट नटली भक्तीत न्हाहून चिंब ……
सारवल्या अंगणी माझ्या शुभ्र प्राजक्ताचा सडा
रांगोळीही सांडली गं अंगणात स्वागताला ….
तुळशीवृंदावनीही साजे दिव्याची ती इवली वात
येगं मंगल प्रहरी उंबरा ओलांडूनी आत …. रांगोळीही सांडली गं अंगणात स्वागताला ….
तुळशीवृंदावनीही साजे दिव्याची ती इवली वात
- सोनाली गाढवे देशमुख. दि. २१ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
Place - Wai Satara
Photo courtesy - Mr. Yashpal Wagh.
Photo courtesy - Mr. Yashpal Wagh.
![]() |
| Morning at the spiritual place Wai |
Saturday, 19 July 2014
Friday, 18 July 2014
Subscribe to:
Posts (Atom)




.jpg)

