खिडकीतलं आभाळ कधी हळूच मनाच्या कोपऱ्यात विसावतं अन मनभर पसरतं, कळतंच नाही …… अन मग ते मनात दाटलेलं आभाळ मोकळं होण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास जरूर सांगा ……….
Tuesday, 22 July 2014
Monday, 21 July 2014
पहाट...
काळोख निघाला ओलांडूनी कृष्णतीर
- सोनाली गाढवे देशमुख. दि. २१ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
वाजे राउळी चौघडा, विझे चांदण्यांची रांग…..
उगवला नारायण , सोनपाऊली उतरून
नवी पहाट नटली भक्तीत न्हाहून चिंब ……
उगवला नारायण , सोनपाऊली उतरून
नवी पहाट नटली भक्तीत न्हाहून चिंब ……
सारवल्या अंगणी माझ्या शुभ्र प्राजक्ताचा सडा
रांगोळीही सांडली गं अंगणात स्वागताला ….
तुळशीवृंदावनीही साजे दिव्याची ती इवली वात
येगं मंगल प्रहरी उंबरा ओलांडूनी आत …. रांगोळीही सांडली गं अंगणात स्वागताला ….
तुळशीवृंदावनीही साजे दिव्याची ती इवली वात
- सोनाली गाढवे देशमुख. दि. २१ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
Place - Wai Satara
Photo courtesy - Mr. Yashpal Wagh.
Photo courtesy - Mr. Yashpal Wagh.
![]() |
| Morning at the spiritual place Wai |
Saturday, 19 July 2014
Friday, 18 July 2014
Wednesday, 16 July 2014
Tuesday, 15 July 2014
तुझ्यातलीच मी व्हायचंय मला ....
ती वाळूतली पाऊल खूण व्हायचंय मला
जिला तुझ्या स्पर्शाच वेड लागून जाईल
तो पहिल्या पावसाचा थेंब व्हायचंय मला
जो तुझ्या गालाच्या स्पर्शानी ओघळायचच विसरून जाईल
ते पाण्यातलं प्रतिबिंब व्हायचंय मला
ज्यात तू स्वतःला नकळत न्याहाळत राहशील
ते शुभ्र चांदणं व्हायचंय मला
जे अंधारातही तुझ्या डोळ्यात सामावून जाईल
तुझ्या गालावरचं खोडकर हसू व्हायचंय मला,
जे नकळत माझ्या रुसव्याच कारण बनून जाईल
जे नकळत माझ्या रुसव्याच कारण बनून जाईल
ती हवीहवीशी आठवण व्हायचंय मला ,
जी नेहमी तुला एकटेपणा पासून दूर ठेवत राहील
जी नेहमी तुला एकटेपणा पासून दूर ठेवत राहील
तुझ्या पापणीतल गोड स्वप्न व्हायचंय मला
जे पाहताना गाली खळी उमटून जाईल
तो मोहक श्वास व्हायचंय मला
जो तुझ्या नसानसात सदैव सळसळत राहील
- सोनाली गाढवे देशमुख. दि. १५ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
- सोनाली गाढवे देशमुख. दि. १५ जुलै २०१४.
© सोनाली गाढवे देशमुख.
Subscribe to:
Posts (Atom)


.jpg)



