Saturday, 17 September 2016

तु.......


खिडकीशी हसली चाहूल जराशी
तुझ्या येण्याचा जणू भास झाला 
 
वाऱ्यानेच केली फसवणूक पुन्हा 
हा उंबरा तर केव्हाचाच तुला अनोळखी झाला 


सोनाली गाढवे देशमुखदि१७ सप्टेंबर २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख



दोघ..


खूप साऱ्या स्वप्नांची गर्दी कधीच नव्हती 
चल एकाच स्वप्नाला दोघ कुरवाळून पाहू 

ओसरीच्या कंदीलाच जगणं माझं 
चल एकाच अंगणातलं दोघ चांदणं होऊ 


-
सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ सप्टेंबर २०१६ 

© सोनाली गाढवे देशमुख



.........बाकी आहे


तुझ्या माझ्या आठवांचे 
जाहले कि कोळसे 
अजून कशाची व्हायची 
राख बाकी आहे 

तू परतल्या मार्गावरून 
फिरुनी ना पाहिले 
सुकलेल्या पाचोळ्याची मात्र 
साथ बाकी आहे 

भरजरी स्वप्नांची लत्करे 
होऊन गेली 
दरिद्री चांदण्याची अजूनही 
रात बाकी आहे 

तू सजवलेल्या भिंतींचा 
रंग केव्हाच विटला 
ओसाड शून्य स्वप्नाची 
चौकट बाकी आहे 


- सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ सप्टेंबर २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख


Friday, 16 September 2016

मेहंदी

हाती तुझ्या मेंदितल्या नक्षीदार आठवांची गुंफण
मनाच्याही दारी बहारो स्वप्नमयी सुखांचे अंगण

- सोनाली गाढवे देशमुख. दि. २० एप्रिल २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख




तुझे हास्य


निखळ तुझे हास्य जणू चांदण्यांचा कवडसा ...
सोनपंखी ऊन्हा मागे ओसरता मेघ जसा …



- सोनाली गाढवे देशमुख. दि. २० एप्रिल २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख.

Thursday, 15 September 2016

जिभ

कशाला गरज तुला चाकू सुऱ्यांची
शब्दांचेच आघात आता असह्य झाले

नको दाखवू गडगंज श्रीमंती तू जिभेजी
चालणारे बोलणारे माझे प्रेत झाले


- सोनाली गाढवे देशमुख. दि. १५ सप्टेंबर २०१६
© सोनाली गाढवे देशमुख

Tuesday, 22 March 2016

पित्र

आई वडील  गेल्यावर त्यांना अचानक पित्र अशी नवीन उपमा देऊन त्यांचे फोटो घरात नसावेत असा समाज असणार्यां लोकांची कीव करावी वाटते

लाज वाटली पाहिजे राव मतलबी कुठले एकजात …. तो बामन दीड शहाणा अक्कल शिकवणारा आणि हे नंदी बैलच जणू …

त्यांनी कष्टानी मेहनतीनं पै पै गोळा करत रक्ताचं पाणी करून काय बामणाला विचारूनचं पोसलेलं का *** ह्यांना

त्यांआईवडिलांची मिळकत बँक बँलंस जमीन जुमला चालतो होय तुम्हाला तो नई आश्रमाला दान करा सांगत तुमचा so called बामन…


- सोनाली गाढवे देशमुख. दि. २२ मार्च २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख.

Tuesday, 23 February 2016

नात्यातलं हेल्दी कन्व्हर्सेशन

आजच्या ठळक बातम्या सांगितल्यासारख फोनवर एका मिनिटाच्या आत दिवसातल्या भराभर गोष्टी सांगून मोकळ व्हायचं आणि आपल्या नात्यात किती सगळंच शेर केल जातं ह्याचा मनोमन सार्थ अभिमान बाळगायचा .....

ह्यालाच नात्यातलं  हेल्दी कन्व्हर्सेशन कि काय म्हणत असावेत …


- सोनाली गाढवे देशमुख. दि. २३ फेब २०१६
© सोनाली गाढवे देशमुख.

Wednesday, 13 January 2016

स्वप्न


नव्या आयुष्याचं एक स्वप्न डोळ्यात नांदलं
डोळ्यातल्या काजळानी आसवांना बांधलं

काजळानी घातलाय अश्रूंना बांध
पण मनातल्या या वादळांना कुठं थोपवू सांग ?

- सोनाली गाढवे देशमुख. दि. १४ जानेवारी २०१६.
© सोनाली गाढवे देशमुख.


Friday, 26 June 2015

पाऊस ...

याच बरसणाऱ्या धारांमध्ये मग कुणालातरी 
हरवलेले क्षण शोधण्याचा छंद जडतो…  

भिजतोय भासवून कुणीतरी कुठेतरी 
उगाचच आसवं लपवत असतो… 


- सोनाली गाढवे देशमुख. दि. २६ जून २०१५.
© सोनाली गाढवे देशमुख.




तु...

माझ्या शब्दांचा दरवळ तुझ्यापर्यंत कधी पोहचलाच नाही 
आणि पोहचला तेव्हाही तुला तो कळला नाही … 

शब्दांच्या पावसात भिजूनही तुला कोरडा राहिलेलं मी पाहिलं
आणि त्या भावनांना मग मी ओंजळी सकट पाण्यातच वाहीलं… 




- सोनाली गाढवे देशमुख. दि. २६ जून २०१५.

© सोनाली गाढवे देशमुख.





Monday, 16 March 2015

तुही मेरा सब कुछ और तुम बिन क्या कहु...



तुही मेरा हमदम तुही मेरी दुवाँ ,
तुही मेरा दर्द तुही मेरी दवा

          तुही तनहाई मेरी तुही मेरी परछाई ,
          तुही दिवानगी कि सरहद तुही दिल की गेहराई

तुही रास्ता मेरा तुही मेरी मंजिल ,
तुही दरिया मेरा तुही मेरा साहिल

        तुही मेरा वजूद तुही किस्मत मेरी ,
        तुही मेरा जजबात तुही हसरत मेरी

तुही तुफाने सैलाब तुही मेरी रूह ,
तुही मेरा सब कुछ और तुम बिन क्या कहु




- सोनाली गाढवे देशमुख. दि. ६  मार्च २०१५.

© सोनाली गाढवे देशमुख.



अपने...


अपने हि तो थे जो इल्जाम लगाके चले गये …

वरना हम पर उंगली उठाने के लिये गैरो मे  दम कहा …


- सोनाली गाढवे देशमुख. दि.   मार्च २०१५.

© सोनाली गाढवे देशमुख.




बेवफा...


परछाई से भी डर लगता है,
आज इतने टूट गए ...

बेवफाई का ईलजाम लगाकर,
तुम जो नीकल गए ...



- सोनाली गाढवे देशमुख. दि.   मार्च २०१५.

© सोनाली गाढवे देशमुख.




Tuesday, 10 March 2015

वास्तव

वास्तव अन स्वप्नातली सीमारेषा 
कोणालाच दिसत नाही 

उघडे डोळे बंद करून 
स्वर्ग काही भेटत नाही . 



- सोनाली गाढवे देशमुख. दि. १०  मार्च २०१५.

© सोनाली गाढवे देशमुख.



Monday, 9 March 2015

वास्तव


स्वप्नांचा अर्थ उलगडण्यात
पहाट अलगद सरून गेली.
उन्हाचा चटका बसला तेव्हा
वास्तवाची जाणीव झाली.


- सोनाली गाढवे देशमुख. दि. ०९ मार्च २०१५.

© सोनाली गाढवे देशमुख.



Wednesday, 17 September 2014

सोसल तेवढंच सोशल !!!

सोशल नेट्वर्किंगचे फायदे अन तोटे असा लेबल लावून मला खरंतर कुठलाही मापदंड लावायचा नाहीये कारण सोशल होणं चूक का बरोबर हा ज्याचा त्याचा वयक्तित प्रश्न आहे. पण माणसा माणसातला कम्युनिकेशन कमी होत चाललं आहे अस वाटता वाटता ते बंदच झाल आहे याचा मनातला सल स्वस्थ बसू देईना.
खरच Chatting वर संवाद कितपत होऊ शकतो जो रोज रात्री एकत्र जेवण घेताना पूर्वी व्हायचा ? कधीकधी वाटतं माणसं मुकी झाली आहेत यामुळं त्यांचे शब्द नाही हाताची बोटं बोलू लागली आहेत आजकाल.

जग इतकं जवळ आलंय कि कितेक किलोमीटर दूर असलेले मित्र एका click नि जवळ येउन पोचले पण हाताच्या अंतरावर असणारे रक्ताची नात्यातली माणसं कोसो दूर झालीयेत. घरातले संवाद कमी, बोलणं कमी, ओघाओघाने त्यातून निर्माण झालेला दुरावा यात कितपत लक्ष घालतात हि मंडळी जी रोज ढिगाने फिलिंग ह्याव फिलिंग त्याव च्या पोस्त लाईक करतात.  त्यावर comment करतात.
एकाच घरात राहून अनेक भिंती उभ्या असलेल्या यांच्या मनात खूप मोठी जागा असते अनोळखी माणसांसाठी….  भलमोठं हजारोंच circle  असतं यांचं , पण त्याच बरोबर अपुर्या संवादामुळे दुरावलेली नाती , ओलावा ,प्रेम टिकून राहायचा असेल किंवा पुन्हा निर्माण करायचं असेल तर कितीजण प्रयत्नशील असतात यातली? कुठेतरी या सर्वांचा समतोल साधला गेलाच पाहिजे पण त्यासाठी आत्मपरीक्षण केलं गेल पाहिजे.
दुर्दैवी हे वाटत कि एखाद्या अपघात अथवा नैसर्गीक आपत्तीच्या बातम्यांना हि हजारो लाईक मिळतात , या घटना कुणाला कशा आवडू शकतात हा अजून एक मला पडलेला गंभीर प्रश्न.

वयाने अजाण प्रगल्भ नसणाऱ्या पिढीला या सुविधा पुरवणारे पालक जबाबदार तरी कसे म्हणावेत , दुसर्याच बाजूला कुठतरी सुशिक्षित पुढारलेली पिढीही यात गुरफटलेली आहेच कि. काळाची अन वेळेची मर्यादा नाही….  लॉगीन आणि लॉग ऑट न प्रत्येकाचं आपापलं स्वतंत्र अन सोप्पं जग बनलं….  ज्यात कुणाचाही हस्तक्षेप नसतो. सहज उपलब्ध झालेले तंत्रज्ञानमोबाईल क्रांती यानं अवघं जग व्यापून जावं बघता बघता तुफान वेगाने अगणित लोकांपर्यंत पोहचण्याची क्षमता असलेलं सोशल नेटवर्क लोकप्रिय न व्हावं तर नवलच.

दृष्टीआडची सृष्टी आभासी असली तरी हवीहवीशी वाटू लागली अन वास्तवाचं भान सुटलं , तरीही अगदीच परिस्थिती निराशाजनक नाहीये सोशल नेटवर्क नेमकं कशासाठी आणि यातून काय मिळवायचं आहे याचं भान ज्याचं त्याला योग्य वेळी ठेवता यावं इतकंच……  

अन म्हणूनच मला वाटत हे सोसल तेवढंच  सोशल  असावं प्रत्येकानी... नाही का


सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ सप्टेंबर २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.



Tuesday, 16 September 2014

लग्न - दामदुप्पट योजना

लग्न - दामदुप्पट योजना

आधीच आपल्या सभोवती विणलेल्या नात्यांची दुपटीने भर ……

रक्ताचीच अस नाही पण आपलेपणानी जन्माला आलेली नाती …. तिची अन त्याचीही…….  त्याचे आई बाबा, बहिण भाऊ, आजी आजोबा, चुलत मावस भावंड , शेजारची काकु  शेजारची मावशी, मामा , मित्र मैत्रिणी शाळेपासूनचे ते नोकरी पर्यंतचे , गल्लीपासून ते फेसबुक पर्यंतचे .

तिने सगळ्यांना सामावून घ्यायचं , त्यांच्यातलं एक बनायचं आणि सोबत आपली नातीही टिकवायची…. पण तिनेच ??? हीच तिची नाती तोही तितक्याच सहजतेने स्वीकारतो का ??? त्यांना तेवढ्याच आपुलकीने जपतो का ??? निव्वळ तिनं घर सोडण्याच्या संकल्पनेवरून तिनंच सगळं स्वीकारावं ??? त्याच्या बाबतीत याच कक्षा अरुंद होत जातात …… नात्यांच्या वर्तुळाचा परीघ छोटा होत जातो ……  अन तो  तिच्या सख्या नात्यांपुरताच  मर्यादित होतो अन त्यातही बिचारी ती धन्यता मानते……   का ??? तिच्या इतपत तो तिच्या एखाद्या मित्राला स्वीकारू शकतो ??? तिचं जग तिचं वलय नुस्त अनुभवण्यासाठी तरी त्यात कधी प्रवेश करू पाहतो का तो ???

तिच्यासाठी  हि दामदुप्पट प्रेमातही झालेली असते….  माणसांबरोबरच  त्यांचं  प्रेम हि दुप्पट होत असं मानणारी ती . पण हेच प्रमाण त्याच्या बाबत लागू पडतं का?
पण हि दामदुप्पट केवळ तिलाच लागू पडते का ???


सोनाली गाढवे देशमुख. दि. १६ सप्टेंबर २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.