Thursday 26 June 2014

चांदण्याचं गाव

काही प्रसंग खूपच वेगळे असतात , दुखं मनाला इतकं हेलावून टाकत आणि त्या क्षणी नेमकी जवळची वाटणारी माणसं हि परकी वाटू लागतात मग कुठंतरी  कधीच नसलेलं नातं जन्म घेतं , न पाहिलेलं , न भेटलेलं आणि त्या दुखात साथ देत केवळ शब्दांनी ,दिसत नसलं तरी त्याचे भाव एकू येतात आणि नकळत बंध जुळू लागतात. 
अंतर्मुख होत मन त्या नात्यात कुठलाच आडपडदा राहत नाही . दुख अजूनही सोबत असतच पण त्याची तीव्रता कमी भासू लागते कोणाच्यातरी अनपेक्षित येण्याने , कुणाच्यातरी फुंकर घालण्यानेजग परक वाटत असताना कुणीतरी आपली विचारपूस करणार आहे या भावनेने . मग मनाला गरुडपंख लाभतात सारं आकाश सामावण्यासाठी , त्या दुखातून  उभारता उभारता काही स्वप्न पहिली जातात , फुलविली जातात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी धडपड सुरु होते , अन त्या धडपडण्यातही आनंद गवसतो ,  माणसाचं मन खरच शेवाळासारखं सतत ओलावा शोधणारं , जुनाट पडक्या भिंतीवरही पावसाच्या काही सरींनी तिथंहि ते फुलतच. आणि मग शीतल चांदण्याचा शोध घेतला जातो एकमेकांच्या साथीने कितीतरी उन्हाळे एकत्र झेलण्याची दोन्ही मनांची तयारी असते. सुवर्ण भविष्यकाळाची स्वप्न तर पाहायला सुरुवात केलेली असते , पण खरच सुखासुखी ती सत्यात उतरतील का , अन ते चांदण्याचं गाव खरंच कधी सापडेल का?


सोनाली गाढवे देशमुख. दि. २६ जून  २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.